जागतिक परिचारिका दिन : मनपा आयुकातांकडून परिचारिकांचा सत्कार

जागतिक परिचारिका दिन :  मनपा आयुकातांकडून परिचारिकांचा सत्कार

नाशिक । प्रतिनिधी

परिचारिका दिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक शहरातील सर्व खाजगी रुग्णालय व मनपाच्या रुग्णालयांमध्ये ज्या परिचारिका रुग्णसेवा देऊन जगाच्या निरोगी आरोग्यासाठी करोनाच्या महामारी मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यांच्या धैर्य व कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मनपाच्या बिटको रुग्णालयातील व डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील परिचारिकांचा सत्कार मा.आयुक्त कैलास जाधव यांनी करून त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.

यावेळी बिटको रुग्णालयातील मेट्रन आशा मुठाळ,सुनीता पगारे,गंगा भोये,शीला मावची व डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील मेट्रन संध्या सावंत,कविता गाडे,छाया शिंदे,नीता धात्रक,सुनीता शिंदे,सुनीता नानाजकर, पगारे, कल्पना सनानसे,उज्वला पाटील, सुरेखा हिवाळे,शितल उपासनी,माई भोसले, भाग्यश्री सहारे,नरेंद्र गवळी,दीप्ती वाजे, विजय गायकवाड,कीर्ती पावरा,उज्वला पाटील आदींचा गौरव मा.आयुक्त कैलास जाधव यांनी परिचारिका दिनानिमित्त केला व सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा दिल्या.

तसेच मा.आयुक्त कैलास जाधव यांनी बिटको रुग्णालय येथे गॅसच्या टाकीचा प्रोटेक्शन गेअर, तसेच परिसरात नव्याने ३ के.एल.टाकी बसवण्याचे सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली व येथील सिटीस्कॅन मशीनच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

डॉ.झाकिर हुसेन रुग्णालय येथे परिसरात ३ के.एल.नवीन टाकी बसवण्याचा प्रकल्प मनपाच्या वतीने हाती घेण्यात आला असून त्याच्या बेस तयार करण्याचे काम सुरू असून त्या कामकाजाची पाहणी करून तेथील कामाचा आढावा घेतला व विविध कामांच्या सूचना तसेच दोन्ही रुग्णालयात सुरू असलेल्या कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.

यावेळी मा.आयुक्त कैलास जाधव यांच्या समवेत शहर अभियंता संजय घुगे,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे,कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी,विभागीय अधिकारी संजय गोसावी,स्वप्नील मुदलवाडकर,कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, डॉ.जितेंद्र धनेश्वर,डॉ.नितीन रावते,उपअभियंता राजपूत पाटोळे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com