जागतिक एड्स दिनविशेष : आता वेळ आलीय घडा दुनियेच्या भट्टीत भाजण्याची!

जागतिक एड्स दिनविशेष : आता वेळ आलीय घडा दुनियेच्या भट्टीत  भाजण्याची!

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

मयुर शेलार ( Mayur Shelar ) चार वर्षाचा असताना आई वडीलांचेे छत्र दुर्धर आजाराने हरपले गेले. चुलत्यांनी सांभाळ केला. बहिणीचे लग्न झाल्यावर माहेरच्या शिदोरी सारखंं तिच्यासोबत पाठवण्यात आले. तिच्याकडे चार वर्ष बर्‍यापैकी गेली. पण समजूतदार झाल्यावर कुरबुरी सुरु झाल्या. कुणावर तरी ‘भार’ झालो आहोत, हे सतत जाणवत राहीले.

सगळं असह्य झाले तेव्हा मयुरने घर सोडले. 4 जुलै 2018 ला स्नेहालय मध्ये दाखल झाला. वेगवेगळ्या कार्यक्रम आणि स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागलो. दहावीचें वर्ष म्हणून अभ्यासाकडे लक्ष दिले. बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यात ऑफिसचा डाटा मेन्टेन करण्यापासून तर रंगकाम, वेल्डिंग या सर्वांचा समावेश होता. संकुलात असताना संस्थेसाठी काहीतरी करावे म्हणून किचन मध्ये मदत करायला सरुवात केली. तिथे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.

आता संस्थेत येऊन साडेतीन वर्षे झाली. मधल्या काळात बर्‍याच गोष्टी बदलल्या. साध्या प्रथम वर्ष कला शाखेत शिकत आहे. तसेच व्होपा संस्थेच्या व्ही स्कुल प्रकल्पात काम करीत आहे. येत्या फेब्रुवारीत संस्थेतून बाहेर पडणार आहे. आतापर्यंत तुडविलेल्या मातीला आकार देऊन एक सुंदर घडा बनवुन झाला आहे. आता हा घडा दुनियेच्या भट्टीत आणि अनुभवाच्या आगीत भाजून काढण्यासाठी निघणार आहे. मग या घड्याला चांगला बाजारभाव येईल. येईल अशी मयूर शेलारला अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com