उद्योगातील संधींबद्दल 'निमा'त कार्यशाळा

उद्योगातील संधींबद्दल 'निमा'त  कार्यशाळा

सातपूर । प्रतिनिधी Satpur

निमा व इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेलच्या वतीने ‘आत्मनिर्भर भारत मिशन-व्यवसाय संधी’ या विषयावर झूम वेबिनार आयोजित करण्यात आला .

सदर वेबिनार फेसबुक लाईव्ह करण्यात आला होता. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर योजनेंतर्गत 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या महामारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांसाठी नवीन संधीबद्दल हीकार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी औद्योगिक धोरण आणि विकास समिती अध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी आत्मनिर्भर योजना व त्यांची अंमलबजावणी बद्दल माहिती दिली.

यावेळी निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत येणार्‍या शासकीय योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले.

आत्मनिर्भर भारत मिशन हे सरकारचे नवे पाऊल असून सर्व उद्योजकांनी इंडियन कंपनी विथ इंडियन रॉ मटेरियल म्हणजेच व्होकल फाँर लोकल व्हावे, असेही सांगितले.

नाशिक जिल्हा हा व कृषी प्रक्रीया उद्योगाचे मोठे केंद्र होण्याची क्षमता या योजनेत आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे अवाहन केले.

या वेबिनारचा अनेक सभासदांनी लाभ घेतला व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 2600 उद्योजकांचा प्रतिसाद मिळाला.

शिवाय प्रश्न-उत्तर या भागात उद्योजकांच्या समस्या समजून घेण्यात आल्या. निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com