कामे दीड हजार; अर्ज दहा हजार

वाटप समिती बैठक स्थगितीची नामुष्की
कामे दीड हजार; अर्ज दहा हजार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या Zilla Parishad विविध विभागांबरोबरच पंधराव्या वित्त आयोगातील fifteenth Finance Commission दहा लाख रुपयांच्या आतील दीड हजार कामांसाठी तब्बल दहा हजार काम मागणी अर्ज प्राप्त झाल्याने मागील आठवड्यातील काम वाटप समितीची बैठक Work Allocation Committee Meeting स्थगित करण्याची नामुष्की प्रशासनावर गट आठवड्यात आली. कामे वाटप समितीची बैठक आता 2 डिसेंबरला घेण्यात येणार आहे.

स्थगित केलेली ही बैठक सोमवारी (दि.22) होणार होती. मात्र, या कामांसाठी दहा हजार अर्ज आल्यामुळे त्याचे तक्ते तयार करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा,यासाठी ही बैठक पुन्हा रद्द करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, बांधकाम यांच्यासह पंधरावा वित्त आयोगाचे अशा सुमारे एक हजार 500 कामांना या महिन्यात प्रशासकीय मान्यता मिळाली. ही सर्व कामे दहा लाख रुपयांच्या आतील असल्यामुळे त्यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता ती सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर सहकारी संस्था यांना थेट देण्यात येतात. त्यासाठी त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येऊन काम वाटप समितीकडून कामांचे वाटप केले जाते.

गत आठवड्यात या दीड हजार कामांसाठी अर्ज मागवण्यात आल्यानंतर 18 नोव्हेंबरला काम वाटप समितीची बैठक नियोजित केली होती. मात्र, कामांसाठी तब्बल दहा हजारपेक्षा अधिक अर्ज आल्याने बैठक सोमवारी (दि.22) घेण्याचा निर्णय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी घेतला होता. मात्र, अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रत्येक कामनिहाय तक्ते तयार करणे, मधल्या तीन दिवसांच्या सुट्यांमुळे बांधकाम विभागांना शक्य झाले नाही. यामुळे सोमवारची कामे वाटप समितीची बैठकही रद्द करण्याची नामुष्की आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com