कामगारांनी आपल्या कारखान्याची व मूळ गावची माहिती उपायुक्त कार्यालय द्यावी : दाभाडे

कामगारांनी आपल्या कारखान्याची व मूळ गावची माहिती उपायुक्त कार्यालय द्यावी : दाभाडे
USER

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

कामगारांनी आपल्या कारखान्याची तसेच आपण राहत असलेल्या मूळ गावाचे सविस्तर माहिती कामगार उपायुक्त यांनी सादर केलेल्या फॉर्ममध्ये भरून जमा करावयाची आहे असे आवाहन कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांनी केले आहे.

मागील वर्षी करोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्थलांतर केले होते परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची त्यामुळे मोठी अडचण झाली होती. हजारो नागरिक रस्त्याने पायी जाताना दिसून येत होते.

या पार्श्वभूमीवर परराज्यातून कामावर आलेले अथवा येथून परराज्यात कामाला गेलेल्या कामगारांनी त्यांची नोंदणी कामगार आयुक्तालयाच्या कार्यालयात करावयाची आहे.

राज्या बाहेरून येणारे अथवा जाणाऱ्या कामगारांची संख्या त्यांच्या गावाची ठिकाणी याबद्दल कोणतीही माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याने मागील वर्षी कामगारांच्या प्रवासाचे नियोजन करणे कठीण झाले आहे.

त्यामुळे या वर्षी त्यांची नोंदणी करून त्यांचे सविस्तर माहिती व अहवाल तयार करण्याचे काम कामगार उपायुक्त यातून सुरू आहे.

कामगारांनी आपल्या कारखान्याची तसेच आपण राहत असलेल्या मूळ गावाचे सविस्तर माहिती कामगार उपायुक्त यांनी सादर केलेल्या फॉर्ममध्ये भरून जमा करावयाची आहे असे आवाहन कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com