'मॅक्सी कॅब' रस्त्यावरून धावण्याआधी आमच्या देहावरून धावतील

'मॅक्सी कॅब' रस्त्यावरून धावण्याआधी आमच्या देहावरून धावतील

नाशकात कामगार संघटना आक्रमक

नाशिक | Nashik

८-१२ आसनी व्हॅनमध्ये प्रवाशांची वाहतूक करता यावी यासाठी राज्य परिवहन विभाग मॅक्सी कॅब परवाने देण्याचा विचार केला आहे. आज याबाबत परीवहन महामंडळाने बैठक घेताच कामगार संघटनाानी तीव्र विरेध केला. मॅक्सी कॅब गाड्या आमच्या देहावरून जातील असा स्पष्ट इशारा देण्यात आला. नाशिकमध्ये कामगार सेनेने निवेदन देऊन मॅक्सी कॅब सहन करणार नाही असे जाहीर केले....

राज्यातील अनेक ग्रामीण भागात लोकांची ने-आण करण्यासाठी सातपेक्षा जास्त जागा असलेल्या वाहनांचा वापर केला जातो. यापैकी अनेक वाहने, ऑटोरिक्षा किंवा टेम्पो-ट्रेलर प्रकारची वाहने असतात. त्यात बदल करण्यात आले आहेत. ते सध्या वैध परवान्यांशिवाय चालतात. त्यांच्या कार्याचे नियमन केले जाणार आहे. परवाने जारी केल्यामुळे, या सर्व वाहनांना तपासणीसाठी जावे लागेल.

सध्या ऑटोरिक्षा, कॅब, टुरिस्ट टॅक्सी आणि 13 पेक्षा जास्त जागा असलेल्या वाहनांसाठी परवानग्या दिल्या जातात. 10-11 लोकांना एकत्र प्रवास करणे अनेकदा कठीण होते. मोठ्या गाड्यांचे बुकिंग करण्याचा पर्याय असला तरी ग्रामीण भागात त्या मिळणे कठीण आहे. तसेच, नियमांनुसार, खाजगी वाहन व्यावसायिक कारणासाठी वापरता येत नाही.

आतापर्यंत परमिट न देण्याचे प्रमुख कारण असे होते की, महामंडळ आणि खासगी बसचालकांचा विरोध, महामंडळाला वाटते की, मॅक्सी कॅब परवाने दिल्यास राज्यातील विविध ग्रामीण भागातील त्यांच्या सेवांवर परिणाम होईल. मात्र, आता त्याबाबत चर्चा झाली आहे.

राज्यभरातील मार्ग निवडण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या बैठकीची माहीती बाहेर येताच एसटी कर्मचार्‍यात उलट सुलट चर्चेला उधान आले. मुंबईच एसटी कर्मचारी कॉंग्रेस नेते श्रीरंग बर्गे यांनी मॅक्स कॅब गाड्या आमच्या देहावरून जातील असे या बैठकीत स्पष्ट केले.

नाशिक येथे कामगर सेनेचे नेते सुभाष जाधव म्हणाले. परीवहन आयुक्तांनी आजच्या बैठकीत पुन्हा खासगी करणाचे भुत उभे केले आहे. हा निर्णय लादल्यास एसटी कामागर सनेा राज्यभर तीव्र आंदोनल केल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com