पोलीसांच्या बंदोबस्तामुळे कामगार वर्ग घरीच

कारखाने बंदचा निर्णय
पोलीसांच्या बंदोबस्तामुळे कामगार वर्ग घरीच

सातपूर | Satpur

जिल्हाधिकाऱ्यांनी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले असले तरी पोलीस यंत्रणेच्या कडक बंदोबस्तामुळे उद्योजकांनी कामगारांना बोलावणे स्थगित करून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा प्रशासनाने उद्योगक्षेत्राला कारखाना आवारात निवासाची व्यवस्था करणे. अथवा दोन किलोमीटर परिसरात कामगारांना ठेवण्यास मुभा दिल्याने उद्योगक्षेत्र सुरळीत चालू राहणे शक्य होते.

मात्र तिकडे जिल्हा प्रशासनाने सवलत दिली आहे, मात्र दुसरीकडे पोलिस प्रशासनाने संचारबंदी वर कडक नियोजन केले असल्याने नाहक कामगारांची अडचण निर्माण करण्यापेक्षा उद्योग बंद ठेवण्यात कडेे उद्योजकांचा कल दिसून आला.

त्यामुळे बुधवारी सकाळी उद्योगक्षेत्र सुरू करण्यासाठी आलेल्याा उद्योजकांनी उत्पाादन प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेत कारखाने बंद केले. त्यामुळे नागरी वसाहत बाजारपेठांत सोबत आता उद्योगक्षेत्र ही बंद राहणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली यात काही चुकीचे नाही. मात्र ही घोषणा राज्यासाठी असणे संयुक्तिक ठरले असते. शासनाने लघु व मध्यम उद्योजकांना लॉक डाऊन काळासाठी इन्सेंटिव्ह म्हणून व्याजदरात सवलत द्यावी. तसेच लेबर वेल्फेअर च्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीच्या बदल्यात या क्षेत्रातील कामगारांच्या खात्यात मानधन द्यावे.

- मंगेश पाटणकर (माजी अध्यक्ष निमा)

जिल्हा प्रशासनाने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. दोन किलोमीटर परिसरात कामगारांची वाहतूक करणे मान्य केले.

मात्र दुसरीकडे पोलिस प्रशासनाने नाकाबंदी करून संचारबंदी चा बडगा उगारला आहे. पोलीस प्रशासनाने कामगारांना ओळखपत्रावर जाण्यास परवानगी दिल्यास उद्योग क्षेत्र सुरू होण्यास अडचण राहणार नाही.

- वरुण तलवार (अध्यक्ष आयमा)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com