नाशिक | प्रतिनिधी

नारळ तोडण्यासाठी झाडावर चढणे एकाच्या जीवावर बेतले आहे. पपया नर्सरी येथे झाडावरून पडून एक कामगार विजेच्या तारांचा शॉक बसून गंभीर जखमी झाला आहे.

तुकाराम भगवान बेंडकुळेअसे या कामगाराचे नाव आहे. आज दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास हा कामगार पपया नर्सरी येथे असलेल्या नारळाच्या झाडावर नारळ तोडण्यासाठी चढला होता.

अचानक त्याचा तोल जाऊन तो झाडालगत असलेल्या विजेच्या तारांवर जाऊन आदळला. यावेळी विद्युतप्रवाह सुरु असल्यामुळे या युवकाला विजेच्या तारांचा जोरदार धक्का बसला. यात हा कामगार गंभीर जखमी झाला. तत्काळ या कामगारास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

हा कामगार एका महिन्यापूर्वी याठिकाणी कामासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळे येथून दाखल झाला असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे. घटनेनंतर सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.