COVID-19
COVID-19|स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत कामगार पॉझिटिव्ह
नाशिक

दिंडोरी : स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत कामगार करोना बाधित

Nitin Gangurde

दिंडोरी । Dindori (प्रतिनिधी)

रासेगाव येथील स्पेक्ट्रम इथर्स लि. कंपनीत आसाम राज्यातील एका कामगाराचा अहवाल करोना पॉझीटिव्ह आला आहे.

हा रुग्ण म्हसरूळ येथे रहात होता. तो रुग्ण आठ दिवसांपासुन कंपनीत आलेला नसुन त्याला चार दिवसांपुर्वीच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाचा अहवाल आज पॉझीटिव्ह आला आहे.

कंपनीने रासेगाव मधील कामगारांना सात दिवस सुट्टी दिली आहे. रासेगाव ग्रामपंचायत हद्दीतील स्पेक्ट्रम कंपनीशी संबंध असलेल्या सर्व कर्मचारी व इतर कर्मचारी व अधिकार्‍यांना घरीच होम क्वांरटाईन रहावे अशी सुचना ग्रामपंचायतीने केली आहे.

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडु नये, तोेंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा, असे आवाहन ग्रामपंचायतीचे उपसरपंच बालाजी पवार व करोना ग्रामस्तरीय समितीने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com