नाशिक | Nashik

कंपनीच्या इमारतीवर सौर उर्जाचे पॅनल बसवित असतांना पडल्याने कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना गुरूवारी (दि.24) सायंकाळी सातपूर औद्योगीक वसाहतीतील कार्बन नाका भागात घडली.

सलमान जाकिर पिंजारी (19 रा.स्वारबाबानगर,जगतापवाडी) असे इमारतीवरून पडल्याने मृत्यु झालेल्या कामगाराचे नाव आहे. ही घटना ग्राफाईड इंडिया लिमीटेड या कारखान्याच्या आवारात घडली.

पिंजारी गुरूवारी सायंकाळच्या सुमारास कार्बननाका परिसरातील ग्राफाईड इंडिया लिमीटेड या कारखान्याच्या इमारतीवर सौर उर्जाचे पॅनल फिट करीत असतांना अचानक सिमेंट पत्रा फुटल्याने तो जमिनीवर कोसळला होता.

या घटनेत गंभीर जखमी झाल्याने वडिल जाकिर हुसेन यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार राठोड करीत आहेत.