पाणी, वीज कापतीसाठी हालचाली सुरू

धोकादायक घरे, वाड्यांना नोटीसा
पाणी, वीज कापतीसाठी हालचाली सुरू
नाशिक मनपा

नाशिक। प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वतीने शहर परिसरातील धोकादायक इमारती (Dangerous buildings) तसेच अतिधोकादायक इमारतींना (High-risk buildings) पावसाळ्याच्या (rainy season) पूर्वसंध्येला नोटिसा बजावण्यात येतात. यावर्षी देखील महापालिका हद्दीतील एकूण 1117 धोकादायक घरे तसेच वाड्यांना महापालिकेच्या माध्यमातून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ही पहिली नोटीस दिली असून लवकरच दुसरी नोटीस दिली जाणार आहे. तर या नंतर ज्या ठिकाणी धोकादायक इमारती आहेत. त्यांनी स्वतःहून याबाबत कारवाई करावी करून घर रिकामे करावे अन्यथा वीज मीटर (Power meter) कापण्यापासून पाण्याचे नळकनेक्शन (Tap connection) देखील कापण्यात येणार आहे. तसेच पोलीस यंत्रणेद्वारे अशा घरांना रिकामे करण्याची कारवाई होणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) सर्व विभागीय अधिकार्‍यांना सूचना (Notice to all Divisional Officers) करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

दरपावसाळ्याच्या पूर्वसंध्येला महापालिकेच्या वतीने शहर परिसरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारती, वाडे तसेच घरांना नोटिसा बजावण्याची कारवाई होते. मात्र यंदा महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Commissioner and Administrator Ramesh Pawar) यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहे. यामुळे पहिली नोटीस नंतर एक महिन्याच्या काळानंतर दुसरी नोटीस बजावण्यात येणार आहे.

त्यानंतर देखील घरे रिकामे न झाल्यास जीवित हानी होणार नाही याची दक्षता घेऊन महापालिका (Municipal Corporation) तसेच पोलिस प्रशासनाच्या (Police administration) वतीने कारवाई होणार आहे. तसेच संबंधितांची यादी वीज वितरण कंपनीला (Power Distribution Company) देऊन त्यांचा वीजपुरवठा खंडित (Power outage) करण्यात येणार आहे. यानंतर महापालिकेच्या वतीने पाण्याचे नळ कनेक्शन देण्यात आले आहे ते देखील कापण्यात येणार आहे.

तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना दिलेल्या अधिकारांतर्गत जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेऊन पोलिस असे धोकादायक घरे, वाडे व इमारतींना रिकामे करणार आहे. महापालिका हद्दीतील सर्व 11170धोकादायक वाडे तसेच घरांना नोटीस बजावण्यात आली आहे.येत्या काही दिवसांमध्ये दुसरी नोटीस देखील दिली जाणार आहेे. यानंतर कारवाईला प्रारंभ होणार आहे.

दरवर्षी घडतात घटना

नाशिक शहर परिसरात विशेषता जुने नाशिक तसेच पंचवटी, गंगाघाट परिसरातील जुने वाडे दरपावसाळ्यात कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अनेक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. भाडेकरी व घरमालक यांच्यातील वादामुळे जुने नाशिक तसेच गंगा घाट परिसरातील अनेक वाडे अत्यंत जीर्ण अवस्थेत आले असले तरी त्याबाबत कारवाई होत नाही. मात्र महापालिका आयुक्तांच्या भूमिकेमुळे शहरातील हा जुना तसेच गंभीर प्रश्न मार्गी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com