मांजरपाडा व भुजबळ कालव्याचे काम अंतिम टप्प्यात

तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती होणार पुर्ण
मांजरपाडा व भुजबळ कालव्याचे काम अंतिम टप्प्यात

येवला | Yeola

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, येवला, निफाड तर काही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरला शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणारा मांजरपाडा प्रकल्प व भुजबळ कालवा अंतिम टप्प्यात असुन येणार्‍या पावसाळ्यात पुणेगाव धरणातुन पूर्ण क्षमतेने पाणी दरसवाडी ते डोंगरगांव पर्यंत पोहचुन तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती आणि भुजबळ साहेबांची शब्दपुर्ती येणार्‍या पावसाळ्यात पूर्ण होत असून, पाणी येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

येवला तालुका सुजलाम सुफलाम करणार्‍या मांजरपाडा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाणी अडवणारी मुख्य भिंत पूर्ण झाली असून त्यावरील रस्त्याचे कामही 15 ते 20 दिवसात पूर्ण होईल.

भुजबळ कालव्याचे काम अनकुटे रेल्वे क्रॉसिंग वगळता जवळपास पूर्ण झालेले आहे. दरसवाडी ते बाळापूर या 40 किमी मध्ये याआधी पाणी येताना आलेल्या सर्व अडचणी यांत्रिकीकरण विभागाकडून 4 पोकलँड, 2 जेसीबी, 2 डंपरच्या सहाय्याने युद्धपातळीवर सुरू आहे. बाळापूर ते डोंगरगाव मधील कालवा साफसफाई, अपूर्ण कामे सुरू आहेत.

रेल्वे क्रॉसिंगचे बॉक्स तयार असून सदर बॉक्स फक्त रेल्वे लाईन खाली शिफ्ट करायचे आहेत. या कामास रेल्वे प्रशासनच्या तांत्रिक अडचणीमुळे उशीर होत असून स्वतः राज्याचे अन्न नागरी पुरवठा व पालकमंत्री छगन भुजबळ हे रोज त्याचा पाठपुरावा करत असुन पावसाळा अगोदर हे काम निश्चित पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मांजरपाडा प्रकल्पाची मुख्य भिंत पूर्ण झाल्याने यावर्षी या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणी प्रवाहित होणार आहे. पुणेगाव धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी दरसवाडीत धरणात पोहचेसाठी कालवा प्रशासन सज्ज आहे.

पाणी आवर्तन अगोदरची कालवा साफसफाई पूर्ण झालेली आहे. दरसवाडी ते डोंगरगाव पर्यंत यांत्रिकीकरण विभागाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येणार्‍या पावसाळ्यात पाणी निश्चितच डोंगरगाव पर्यंत पोहचेल.

मांजरपाडा प्रकल्पाची मुख्य भिंत पूर्ण झाल्याने तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती आणि छगन भुजबळ यांची शब्दपुर्ती येणार्‍या पावसाळ्यात पूर्ण होईल यात शंका नाही.

-मोेहन शेलार, पाणी आंदोलक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com