इगतपुरी । Igatpuri

इगतपुरी शहराची विज गेल्याने बुधवारी सकाळ पासून तहसीलदार कार्यालयाचे काम ठप्प होते.

उतारे मिळणारया खिडक्या, तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय लोकांनी गजबजलेले असताना वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. विना वीज कोणतेही काम होत नसल्याने काही अधिकाऱ्यांनी तात्पुरते कार्यालय सोडून बाहेर पाय काढला.

आश्चर्यकारक म्हणजे, तहसीलदार यांच्या केबिन मध्ये मात्र बैकअप असल्याने तिथे वीज पुरवठा सुरळीत होता. पण रेकॉर्ड रुम, तलाठी कार्यालय व इतर कार्यलयामध्ये अशी सोय नसल्याने तेथील कामे ठप्प होती.

यामुळे नागरिक हतबल झाल्याचे दिसून आले. महावितरण अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मुख्य वाहिनी मध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याचे त्यानी सांगितले.