सेंट्रल पार्क चे काम अंतिम टप्प्यात

सिंगापूरच्या धर्तीवर तयार होणाऱ्या या प्रकल्पाचे नाशिककरांचे वेध
सेंट्रल पार्क चे काम अंतिम टप्प्यात

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

नाशिकच्या( Nashik ) वैभवात भर पाडणारा नवीन नाशकातील ( New Nashik ) मोरवाडी येथे विकसित होत असलेल्या सेंट्रल पार्कचे ( Central Park )काम युद्धपातळीवर सुरु असून हा भव्य प्रकल्प पर्यटकांसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे.

नवीन नाशिक महानगरपालिका विभागांतर्गत छोटी मोठी सुमारे ७५ उद्याने परिसरात आहे. अंबड,नवीन नाशिक,व सभोवतालच्या परिसरात वाढती लोकसंख्या विचारात घेता नाशिक महापालिका व आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून सेंट्रल पार्क विकसित केले जात असून सद्यस्थितीला सेंट्रल पार्क चे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

गेल्या सुमारे पंधरा वर्षापासून १७ एकर जागेवर पेलिकन पार्क नावाने प्रलंबित असलेला प्रकल्पाचे सुमारे सव्वा वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. हा प्रकल्प सेंट्रल पार्क नावाने उदयाला येत असून सुमारे अठरा कोटी रुपये निधी खर्चून हा प्रकल्प उभा केला जात आहे.

नाशिककरांसह पर्यटकांसाठी सेंट्रल पार्कच्या माध्यमातुन एक चांगले उद्यान विकसित होत आहे. या उद्यानाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे जात असून काही महिन्यांतच हे उद्यान पर्यटकांसाठी खुले केले जात आहे.

सेंट्रल पार्क मध्ये असलेल्या सुविधा

1. एन्ट्रस प्लाझा मध्ये कार पार्किंग, बस पार्किंग, ॲटोरिक्षा पार्किंग असणार आहे

2) तिकीट घर

3) 2 किमीचा जाँगिंग पार्कवर जॉगिंग ट्रॅक,

4) सेंट्रल प्लाझा मध्ये ॲम्पिथिएटर, वॉटर बॉडी तसेच ऑर्कीडियम असणार आहे या ऑर्किडियमचा उपयोग शाळा, कॉलेज यांना छोटे छोटे इव्हेंट दाखविण्यासाठी होवू शकतो तसेच या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई सह पुष्पोत्सव पण असणार आहे.

5) नागरिकांसाठी ई-टॉयलेट ही संकल्पना यामध्ये अंतर्भूत आहे जेणेकरुन स्वच्छता राखली जाईल

6) लहानमुलांसाठी आधुनिक व मनोरंजनात्मक खेळणी असणार आहे.

7) शहरी मुलांना मातीवर खेळण्याचा आनंद घेता यावा याकरिता सँड फिल्डचा समावेश आहे.

यांसह अनेक सुविधांचा समावेश या भव्य सेंट्रल पार्क मध्ये आहे.

नवीन नाशकातील पेलिकन पार्क हा सुमारे १७ एकर जागेत तयार करण्यात आलेला प्रकल्प काही कारणास्तव बंद पडला. मात्र नवीन नाशिककरांसाठीच नव्हे तर संपुर्ण नाशिक कर व बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी याठिकाणी सेंट्रल पार्क हा सिंगापूरच्या धर्तीवर मोठा प्रकल्प मोरवाडी मध्ये काही महिन्यांतच सुरु होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com