मर्जीतील ठेकेदारांसाठी दीड महिन्यापासून कामे अडविली
USER

मर्जीतील ठेकेदारांसाठी दीड महिन्यापासून कामे अडविली

- नाशिक जिल्हा कॉन्ट्रक्टर्स असोसिएशनचे पालकमंत्र्यांना निवेदन

नाशिक । प्रतिनिधी

निफाड उपविभागातील कामे मर्जीतील ठेकेदारांनाच काम मिळवून देता यावीत,यासाठी तब्बल दीड महिन्यांपासून कामे अडवून ठेवली आहेत, असा आरोप नाशिक जिल्हा कॉन्ट्रक्टर्स असोसिएशनने केला आहे. याविषयी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड व पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,जिल्हा परिषदेत मक्तेदार ठरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे व प्रभागी अभियंता विजयकुमार कोळी हे हस्तक्षेप करत आहेत. असा आरोपही संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनात केला आहे. निफाड वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये ई-निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत.

याविषयी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे.मात्र, याबाबत अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच ई-निविदा कामे भरताना संबंधित उपविभागीय अभियंत्याचा काम प्रलंबित नसल्याबाबतचा दाखला घेण्याची अट घालण्यात आली आहे.

आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच हे काम मिळावे, हाच यामागचा उद्देश असल्याचा आरोप या संघटनेचे सरचिटणीस सुनील कांदे, अध्यक्ष विजय घुगे, उपाध्यक्ष विजय पाटील यांनी निवेदनात केला आहे. त्यामुळे निफाडच्या कामांवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com