सौर पथदीवे बसविण्याच्या कामास सुरवात

खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश
सौर पथदीवे बसविण्याच्या कामास सुरवात

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

आर.ई.सी कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून ( REC Company's Social Responsibility Fund) लोकसभा मतदारसंघातील गावांमध्ये 1650 सौर पथदीप ( Solar Streets Lights ) बसविण्यात येणार असून नाशिक तालुक्यातील 77 गावांमध्ये 671 सौर पथदीप बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. याकामी खा. हेमंत गोडसे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून ऐन पावसाळ्यात गावे प्रकाशमय होत असल्याने नाशिक तालुक्यातील ग्रामस्थांकडून खा. गोडसे ( MP Hemant Godse ) यांच्या कामगिरीविषयी समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागात सतत विजेच्या तुडवडा असल्याने येथील रहिवाशांचे जनजीवन उंचावण्यासाठी सौर पथदीप हा उत्तम उपाय ठरणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील ग्रामीण भागात सतत वीजपुरवठा खंडित होत असतो. यामुळे तासनतास रहिवाशांना अंधारात राहावे लागते. विद्यार्थ्यांना अभ्यासापासून वंचित राहावे लागते. पावसाळ्यात तर अनेक दुर्देवी घटनांचा रहिवाशांना सामोरे जावे लागते. यामुळे ग्रामीण भागात सौर पथदिप बसवावे, अशी मागणी सतत विविध गावांमधील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळांकडून खा. गोडसे यांच्याकडे होत होती.

ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची मागणी न्यायिक असल्याने प्रत्येक गावात सौर उर्जेवर चालणारी पथदिपे बसविण्यासाठी खा. गोडसे यांनी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आर.ई.सी कंपनीने त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून 2 कोटी 57 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या निधीतून आता तीन तालुक्यांमध्ये 1650 पथदिपे बसविण्यात येणार आहे. पैकी नाशिक तालुक्यातील 77 गावांमध्ये 671 सौर पथदिपे बसविण्याचे काम प्रत्यक्षपणे सुरू झाले आहे. गावोगावी सौर पथदिपे बसविण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने नाशिक तालुकावासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com