महिला बचतगटांना मिळतेय जागतिक बाजारपेठ

हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तूंसाठी प्रतिसाद
महिला बचतगटांना मिळतेय जागतिक बाजारपेठ
USER

नाशिक | Nashik

स्थानिक व छोट्या स्तरावरील कारागिर (Local and small scale artisans), बचतगट (Bachatgat) यांचे उत्कृष्ट उत्पादने केवळ डिजिटल ज्ञानाअभावी (Digital Information) जागतिक ग्राहकांपर्यंत पोहचू शकत नाही.

ही गोष्ट लक्षात घेउन इंडोक्राफटी (Indocrafty) या स्टार्टअपच्या माध्यमातून हस्तकला (Handicraft) व कलाकुसरीच्या वस्तूंसाठी जागतिक स्तरावरील बाजारपेठ (Global Market) खुली करून दिली आहे.

पोर्टलद्वारे या उत्पादनांस प्रतिसाद मिळत असून, महिला बचतगटांसह (Womens Bachatgat) कारागिरांना बळ मिळत असल्याचे इंडोक्राफटीचे संस्थापक आणि युथ इन्स्पिरेटर अवॉर्ड विजेते अभिषाल वाघ (Abhishal Wagh) यांनी सांगितले. अभिषाल वाघ आणि रुपल गुजराथी यांनी इंडाक्राफटी डॉट (Indacrafty Dot Com) कॉमला सुरवात केली आहे.

या उपक्रमाविषयी वाघ यांनी सांगितले की, की ग्रामीण, आदिवासी भागात In (Tribal Areas) सामाजिक भागात सामाजिक काम करत असतांना दुर्गम भागातील कारागिर, बचतगट यांच्यामार्फत अनेक उत्कृष्ट उत्पादने (Excellent product) बनविली जात आहेत. परंतु ही उत्पादने त्यांच्या सभोवतालच्या स्थानिक बाजारपेठेतच मर्यादित राहातात.

ही गोष्ट हेरुन सामाजिक भावनेतून या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इंडोक्राफटी डॉट कॉम या पोर्टलला सुरवात केली आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे बचतगटांनाही याद्वारे बळ मिळाले आहे.

तळागाळातील महिलांचा समावेश (Women Involvement) असलेल्या बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करणारे पत्र या बचतगटांकडून प्राप्त झाले असल्याचे वाघ यांनी सांगितले.

ग्राहकांनी हस्तकलेच्या सुरेख वस्तू खरेदीसाठी संकेतस्थळाला भेट देत स्थानिक कारागिर, बचतगटांना बळ देण्याचे आवाहन वाघ यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com