मुळाणे येथे महिलांचा हंडा मोर्चा

मुळाणे येथे महिलांचा हंडा मोर्चा

दिेंडोरी । प्रतिनिधी | Dindori

हंडाभर पाण्यासाठी कोसो मैल भटकंती कराव्या लागणार्‍या संतप्त महिलांनी मुळाणे ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा (Pot strike) काढत आपला संताप व्यक्त केला. मुळाणे (Mulane), ता. दिंडोरी (dindori) या गावचा गेल्या 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा (drinking water) पुरवठा बंद असल्यामुळे पाण्यासाठी येथील महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

शेतातील शेतकरी (farmers) वर्गाच्या विहिरीवरून (well) महिलांना पाणी आणावे लागत आहे. गावाला पाणीपुरवठा (Water supply) करणार्‍या विहिरीला पुरेसे पाणी आहे. पण लोकांना पाणी का मिळत नाही. याबाबत ग्रामसेवक याची भूमिका काय ? असा सवाल महिला वर्गाने उपस्थित केला आहे. मागील काही महिन्यांपासून पाण्याची परवड व्यथा सुरू आहे. यासाठी शासनाने जे धोरण निर्माण केले ते म्हणजे घराघरात पिण्याच्या पाण्याची सोय (Drinking water facility) ही योजना याठिकाणी राबविण्यात आली.

यासाठी ग्रामस्थांकडून नळजोडणीसाठी अकराशे रुपये देणगी ही घेण्यात आली. परंतु पाणीपुरवठा (Water supply) काही सुरळीत झाला नाही. पाणी योजनेतील कामे अर्धवट अवस्थेत पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात (summer) पिण्याच्या पाण्याबाबत दुर्लक्ष करणे म्हणजे महिला वर्गाची एकप्रकारे संतापाला गवसणीच म्हणावी लागेल. याबाबत संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

गावांला पाणी पुरवठा करण्यात येणार्‍या विहिरीतील वीजपंप नादुरुस्त झाला असून हा पंप अजून का दुरूस्त केला जात नाही, असा संतापजनक प्रश्न महिला वर्ग करीत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लागवा म्हणून महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चाही काढला आहे. योळी ललिता खांडवी, लक्ष्मीबाई गायकवाड, ताराबाई महाले, मालती चौधरी, जिजाबाई जाधव, यमुनाबाई कुवर, सुमनताई जाधव, हिराबाई जाधव, भारती महाले, सुनंदा येवले, किरण कुवर, राजेंद्र काकडे आदी उपस्थित होते.

आदिवासी विभागांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये पाणीयोजना, हागणदारीमुक्ती योजना, वाड्यावस्ती योजना, परंतु काही योजनाचा इकडे कानाडोळा होत असतो. त्यामुळे ग्रामीण भाग नेहमी वंचित राहातो. या कारणामुळे मुळाणे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक झाली असुन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासक व ग्रामसेवक यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

किरण कुवर, ग्रामस्थ मुळाणे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com