पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon

लासलगाव (lasalgaon) शहराला गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पाणी (water) मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या महिलांनी इच्छापूर्ती गणपती मंदिर पासून लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयावर (Lasalgaon Gram Panchayat Office) हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

यावेळी महिलांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि सत्ताधार्‍यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप (Lasalgaon Market Committee Chairperson Suvarna Jagtap), जि.प. सदस्य डी.के. जगताप, प्रकाश दायमा, प्रकाश पाटील, अमोल थोरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. किल्ल्याच्या पाठीमागील इच्छापूर्ती गणेश मंदिरापासून मोर्चाची सुरवात होऊन शनि मंदिर, बाजारपेठ, झेंडा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.आंबेडकर रोड मार्गे मोर्चाची सांगता तलाठी कार्यालयाजवळ झाली.

ग्रा.पं. सदस्या संगीता पाटील, प्रमिला पाटील, ज्योती निकम, ज्योती शिंदे, स्मिता कुलकर्णी, संगीता चाफेकर, भारती भांबारे, रंजना शिंदे, रूपा केदारे, अश्विनी पाटील, सुवर्णा पाटील, मणियार भाभी, शेखभाभी मन्सूरी भाभी, श्रद्धा बंब, श्वेता आब्बड, नसीम शेख, अयाज शेख, राजेंद्र चाफेकर, दत्ता पाटील, बापू लचके, मनीष चोपडा, संगीता सुरशे आदींसह मोठ्या संख्येने महिला हंडा घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी सुवर्णा जगताप, स्मिता कुलकर्णी आदींसह संतप्त महिलांनी तीव्र भावना व्यक्त करतांना अनियमित होणारा पाणीपुरवठा (Water supply) व त्यामुळे होणारे नागरिकांचे हाल तसेच घंटागाडीची अनियमितता त्याचप्रमाणे शहरात साफसफाई (Cleaning) या समस्यांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याने नाराजी व्यक्त केली. लासलगाव शहर व परिसरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून भीषण पाणीटंचाई (Water scarcity) जाणवत आहे. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामविकास अधिकारी शरद पाटील (Village Development Officer Sharad Patil), मंडल अधिकारी भाऊसाहेब देवकाते (Divisional Officer Bhausaheb Devkate) यांना पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा याबाबत महिलांच्या वतीने निवेदन (memorandum) देण्यात आले. लासलगाव परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून महिला व नागरिकांना मोठी झळ बसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा (water supply) सुरळीत करावा. तसेच येत्या 15 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास यापुढे पाण्यासाठी तीव्र आंदोलन (agitation) करण्यात येईल असा इशारा सुवर्णा जगतात, प्रकाश पाटील यांनी दिला आहे.

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन लासलगाव शहरात पाणीपुरवठा विस्कळित झाला असून नागरिकांना मोठी झळ बसत आहे. 16 गाव पाणी पुरवठ्याची नवीन पाईपलाईन होण्यासाठी 17 कोटी रुपये मंजूर झाले असून आतापर्यंत त्याचे काम सुरू झालेले नाही. गावकर्‍यांची गैरसोय लक्षात घेता त्या पाईप लाईनची लवकरात लवकर डागडूजी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच येत्या 15 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- सुवर्णा जगताप, लासलगाव

सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे जलजीवन मिशन मधून दुरुस्तीचे काम मंजूर झाले असून सदर कामाची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधून या कामाची कार्यवाही चालू आहे. लवकरच सोळा गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत कार्यान्वित होईल.

- शरद पाटील, ग्रा.वि. अधिकारी लासलगाव ग्रा.पं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com