इंदिरानगर | Indiranagar

वडाळा गावातील डॉ मुश्ताक शेख यांच्या दवाखान्यात तोडफोड करून त्यांना मारहाण करणारा संशयित ईरफान शेख उर्फ चिपडयास पोलिसांनी वडाळा गावातून अटक केली. अटक का केली याची विचारणा करण्यासाठी पोलीस ठाण्यावर सुमारे 200 महिलांचा मोर्चा आणला. पोलिसांनी कारवाई करण्याची सूचना केल्यावर मोर्चा करांनी तेथून काढता पाय घेतला.

वडाळा गावातील सादिक नगर येथील विवाहित महिलेचा विनयभंग केला म्हणून डॉ शेख यांना मारहाण करून क्लिनिकची तोडफोड केल्याप्रकरणी तसेच विवाहित महिलेचा विनयभंग केला म्हणून परस्परविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंगळवार (दि 22) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास संशयित इरफान यास अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर कर्मचाऱ्यांसह सादिक नगर येथे गेले असता पोलिसांना पाहून तो पळू लागला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.

त्यावेळी कुठलीही पूर्व माहिती न देता पोलीस ठाण्यावर परिसरातील सुमारे दोनशे नागरिक त्यात महिला व पुरुष यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा आणला. संशयित इरफान यास अटक का केली म्हणूण पोलिसांना विचारणा केल. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात सहाय्यक, आयुक्त अशोक नखाते पोलिसांचा फौजफाटा घेऊन त्वरित इंदिरानगर पोलीस ठाणे येथे आले.

त्यावेळी पोलिसांनी जमावास ध्वनीक्षेपणावदारे निवेदन करत तुम्ही कायद्याचे उल्लंघन करत असून तातडीने निघून जावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात येत होता. यावेळी मोर्चेकऱ्यांचे शंका निरसन झाल्यावर जमावाने तेथून काढता पाय घेतला. या प्रकरणातील संशयित डॉ. शेखसह इरफान यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इरफानला का अटक केली अशी विचारणा करण्यासाठी सुमारे दोनशे महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्याची पूर्वकल्पना असल्याने वेळीच वरिष्ठाना माहिती देत बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच मोर्चे करांचे शंकाचे निराकरण करण्यात आले.

- वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर