मोहमुख ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात महिलांचा मोर्चा

मोहमुख ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात महिलांचा मोर्चा

ठाणापाडा | प्रतिनिधी

कळवण तालुक्यातील (Kalvan Taluka) ग्रुपग्रामपंचायत मोहमुख ग्रामपंचायत (Mohmukh Grampanchayat) अंतर्गत चिचोंरे गावातील व ग्रामस्थ महिलांनी थेट ग्रामपंचायत मार्फत अनेक जीवनावश्यक समस्यांपासून वंचित राहत असल्याने मोहमुख ग्रामपंचायतीवर महिला वर्गानी मोर्चा काढला.

समस्या त्वरीत सोडावावी म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन थेट आदिवासी विकास प्रकल्प कळवण व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, गावांच्या शिवारातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये गरोदर माता, वृद्ध अशा रुग्णांना घेऊन जाणे अत्यंत जिकिरीची व तारेवरची कसरत करावी लागते.

तसेच १० वर्षी ग्रामपंचायत मार्फत शासकीय योजनेतून ३०० फुटापर्यंत जलवाहिनी झाली होती, मात्र ग्रामस्थांना आजपर्यंत एक थेंब ही पाणी पिण्यास मिळाले नाही. त्यामुळे आम्ही आमची शेतीची कामे सोडून पायी मार्चा काढून समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी निर्मला ठाकरे, सिंधू ठाकरे, लताबाई गायकवाड, कविता कवर, विठा कवर, नाना गांगुर्डे, रोहिदास गायकवाड, रामदास गायकवाड, धनराज गायकवाड आदींसह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com