उद्योगांत महिलांचा पुढाकार महत्त्वाचा : खा. गोडसे

उद्योगांत महिलांचा पुढाकार महत्त्वाचा : खा. गोडसे

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

मेहनत, जिद्द व दर्जा Hard work, perseverance and quality या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळते. देवळालीत महिलांनी उद्योगांत घेतलेला पुढाकार Initiatives taken by women in the industry हा नवी दिशा दर्शवणारा असल्याचे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे MP Hemant Godse यांनी केले.

लॅमरोड परिसरात स्मिता आर्य व त्यांच्या सहकार्‍यांनी सुरत येथील सर्व प्रकारचे फ्रोजन फुड, नमकीन, बेकरी उत्पादन, मिठाई यांचे दालन उभे करताना 100 वर्ष पूर्ण झालेल्या नामांकित ब्रँडची उत्पादने देवळालीकराना उपलब्ध करून देताना महिला रोजगाराला प्रधान्य दिले आहे. या उपक्रमाचे उदघाटन खा. गोडसे यांचे हस्ते झाले. .

प्रास्ताविकातून संचालिका स्मिता आर्य यांनी देशात प्रसिध्द असलेल्या सुरत येथील खाद्य पदार्थ देवळालीकरांना उपलब्ध करून देताना, महिलाही पुरुषांइतक्याच कर्तृत्ववान असून व्यवसायात मागे नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

यावेळी युवती सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष भक्ती गोडसे, अजिंक्य गोडसे, स्टारलाईट कंपनी सातपूरच्या संचालिका, डॉ. रोचना भारती, अरविंद भारती, रवींद्र भारती, सुरत येथील एस मोतीराम कंपनीचे मालक गौरव सुखडीया, आशिष चव्हाण, कचरू गोडसे आदी व्यासपीठावर होते. स्वागत व आभार बच्चुभाई आर्य यांनी तर सूत्रसंचालन सुधाकर गोडसे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com