इगतपुरी
इगतपुरी
नाशिक

ऐन पावसाळ्यात महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

उपोषणाचा इशारा

Gokul Pawar

Gokul Pawar

घोटी | Ghoti

पिण्यासाठी योग्य व स्वच्छ पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांनी थेट ग्रामपंचायतच्या बाहेर हांडे घेऊन ठिय्या आंदोलन केले. इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे ही घटना घडली.

दरम्यान यावेळी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक, कोणीही उपस्थित नसल्याने शिपायाची तारांबळ उडाली.

येथून हाकेच्या अंतरावर भामधरण असूनही पाणी टंचाई जाणवत आहे. आम्ही वेळोवेळी पाण्याची तक्रार करूनही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे आज महिलांचा बांध तुटल्याने थेट ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.

यावेळी या मोर्चात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय न झाल्यास आम्ही पंचायत समिती इगतपुरी येथे उपोषणास बसणार अशा इशारा यावेळी या महिलांना दिला.

Deshdoot
www.deshdoot.com