दिंडोरी
दिंडोरी
नाशिक

दिंडोरीत रेशनकार्डसाठी महिलांचा ठिय्या

श्रमजीवी संघटनाच्या माध्यमातून...

Gokul Pawar

Gokul Pawar

दिंडोरी । Dindori

तालूक्यातील रेशनकार्डापासुन वंचित जनतेला रेशन मिळण्यासाठी तत्काळ रेशनकार्ड मिळावे या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने दिंडोरी तहसिलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. भर पावसातही हे आंदोलन सुरु आहे.

सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने गरीब कुटुंबांचे प्रचंड हाल सुरु झालेले आहे. याची जाणीव ठेवुन केंद्र शासनाने पंतप्रधान कल्याणकारी योजनेतंर्गत रेशन कार्डवर गेल्या तीन महिन्याचा मोफत धान्य, डाळ आदी वस्तु देण्याचा तसेच ज्या कुटूंबाकडे शिधापत्रिका नाही. त्यांनाही धान्य देण्याचा निर्णयं घेण्यात आला आहे. या पार्श्‍वभुमिवर संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर अंतिम सुनावणी होऊन आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी हमी पत्र सादर केले होते.

आदिवासी कुटूंबांना तत्काळ शिधापत्रिका देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. शिधापत्रिका काढण्यासाठी लागणारे कागद पत्रांची पुर्तता लॉकडाऊन नंतर दयावे या आदेशानंतर दिंडोरी तालूक्यातील आदिवासी बांधवांचे अर्ज कार्यालयात दाखल आहे. केवळ शासनाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे कुटूंबांना रेशनकार्डपासुन वंचित रहावे लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे.

करोना विषाणुने कोणी प्राण गमवु नये तसेच रेशन धान्यावाचुन कोणी उपाशी राहुन जीव गमावु नये हेही महत्वाचे असल्याने रेशनकार्डसाठी आंदोलन करावे लागत असल्याचे संघटनेने सांगुन दिंडोरी तहसिलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. भर पावसातही हे आंदोलन सुरुच होते.

दरम्यान या आंदोलकांची दुपारी नायंब तहसिलदार दर्शना सुर्यवंशी यांनी भेट घेतली. कोव्हीड रुग्णाबाबत उपाययोजना करण्यासाठी तहसिलदार कैलास पवार हे दौर्‍यावर गेले असल्याने आंदोलकांची व त्यांची भेट होऊ शकली नाही.

Deshdoot
www.deshdoot.com