गंगापूर रोड परिसरात महिलेची आत्महत्या

गंगापूर रोड परिसरात महिलेची आत्महत्या
आत्महत्या

नाशिक | Nashik

राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (दि.३०) रात्री शरणपुर रोड परिसरात घडली.

गायत्री दिपक देशमुख (२१, रा. देशमुख बंगला, शरणपुर रोड) अशी आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुख यांनी अज्ञात कारणातून गुरूवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राहते घरात साडीच्या सहायाने छतास गळफास लावून घेत आत्मत्या केली. ही बाब निदर्शनास येताच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले.

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार धारणकर करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com