<p>नांदगाव | Nandgoan</p><p>नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथील बावीस वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.</p> .<p>चिंचविहिर येथील शितल अनिल गांगुर्डे या तरूण विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.</p><p>याप्रकरणी दिलीप बोरीलाल भिडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शितलचा शारीरिक व मानसिक केला गेल्याने तिने आत्महत्या केल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी पती अनिल रमेश गांगुर्डे, दिर सुनील रमेश गांगुर्डे, सासरे रमेश गांगुर्डे, सासू शांताबाई गांगुर्डे, ज्ञानू नवले या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि दिपक सुरवाडकर करीत आहे.</p>