स्वयंरोजगारासाठी महिलांना प्रोत्साहन मिळावे

स्वयंरोजगारासाठी महिलांना प्रोत्साहन मिळावे

निफाड। प्रतिनिधी | Niphad

आजची महिला शिकली आहे. ती सुसंस्कृत झाली आहे. मात्र तिला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदतीची गरज आहे. आजची महिला बचतगटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत आहेत.

निफाड (niphad) नगरपंचायतीच्या (nagar panchayat) माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती (Employment generation for women) व मार्गदर्शन (Guidance) करावे या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला असून अशा कार्यक्रमातून महिलांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे येथे असलेल्या महिलांनी इतरांना सांगून यासाठी प्रोत्साहित करावे. ‘हृदयात राम अन् प्रत्येक हाताला काम’ हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न असून ते साकार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रूपाली विक्रम रंधवे (Mayor Rupali Vikram Randhave) यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे संकल्पनेतून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी निफाड नगरपंचायत व संजिवनी सहकारी सेवा संस्था (Sanjivani Sahakari Seva Sanstha) यांचे संयुक्त विद्यमाने लघुउद्योग व बचतगट मेळावा तसेच निर्मिती वस्तुचे विक्री आदी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा रुपाली रंधवे बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपिठावर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदिप पाटील, नगरपंचायत सभापती पल्लवी जंगम, नगरसेविका डॉ.कविता धारराव, शारदा कापसे, रत्नमाला कापसे, सुलोचना होळकर, कांताबाई कर्डीले, अरूंधती पवार, अलका निकम, नगरपंचायतीचे हर्षवर्धन मोहिते आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा रुपाली रंधवे म्हणाल्या की, महिलेच्या हाताला काम मिळाले तर ती स्वत:च्या पायावर उभे राहू शकते. जसे की फुलाने फुले जोडली तर फुलांची सुंदर माळ तयार होते तसेच माणसातून माणसे जोडत गेलो तर माणुसकी आपोआप जपली जाते.

महिला बचतगटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र आज ज्या काही महिला येथे उपस्थित नाही त्यांनाही महिला बचतगटाचे व रोजगार निर्मितीचे महत्व समजावून सांगत त्यांनाही महिला बचतगटाच्या प्रवाहात आणावे. शासनाच्या माध्यमातून ज्यांंना जी काही मदत करता येईल त्यासाठी निश्चित प्रयत्न करू असे प्रतिपादन रंधवे यांनी केले.

यावेळी संदिप पाटील यांनीही महिला बचतगटासाठी शासनाच्या योजना, कर्ज प्रकार, कर्जफेडीचे धोरण, व्याजदर तसेच बचतगटासाठी पूरक उद्योग व्यवसाय यांची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी नगरपंचायतीचे कर्मचारी, निफाड शहरातील महिला, बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com