अवैध मद्यविक्री विरोधात महिलांचा मोर्चा

पोलिसांना निवेदन ; विक्री बंदची मागणी
अवैध मद्यविक्री विरोधात महिलांचा मोर्चा

ओझर | वार्ताहर | Ozar

दिक्षी (Dikshi) येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री (Illegal sale of alcohol) तत्काळ बंद करावी या मागणीसाठी गावातील सुमारे 100 आदिवासी महिला तसेच

आदिवासी (tribal) शक्ती सेनेचे कार्यकर्ते यांनी ओझर पोलीस स्टेशनवर (Ozar Police Station) मोर्चा काढत या मागणीचे निवेदन (memorandum) ग्रामपंचायत सरपंच संगीता चौधरी यांच्या हस्ते ओझरचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे (Ozar Police Inspector Ashok Rahate) यांना दिले आहे.

दिक्षी येथील आदिवासी महिलांनी पोलीस स्टेशनला मोर्चा काढत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावात अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या दारू विक्री केली जात आहे. अनेकदा ग्रामस्थांनी यासंदर्भात निवेदने (memorandum) दिली असून यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. या बेकायदेशीर दारू विक्री अड्डयावर दारू पिऊन अनेक कुटुंब उद्धवस्त झाले असून देशोधडीला लागले आहेत.

या अड्डयावर दारू पिण्यासाठी शालेय विद्याथी (students) सुद्धा जात असल्याने विद्यार्थी व्यसनाधीन होत आहे. अनेकदा ग्रामस्थांनी सदर बेकायदेशीर धंद्याबाबत ओझर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रारी केल्या पण या विषयावर पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपस्थित महिलांनी केला. तसेच संबंधित व्यावसायिकांना गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी समजून सांगितले असता तुमच्यावर जातीवादाचा गुन्हा दाखल करू, आम्ही वर पर्यंत हप्ते देतो, आमचे कोणीही काही करू शकत नाही या भाषेत त्यांना दम देण्यात आल्याचा किस्सा उपस्थित नागरिकांपैकी एकाने पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांचेसमोर सांगितला.

नक्की कोणाच्या वरदहस्तामुळे हे धंदे चालता याचा शोध लावणे महत्वाचे आहे. तसेच ही बेकायदेशीर दारू विक्री (Illegal sale of alcohol) कायमस्वरूपी बंद करण्यात आली नाही तर आम्ही कायदा हातात घेत संबंधित दारू विक्री करणार्‍यांना चोप देवू असा इशारा उपस्थित महिलांसह आदिवासी शक्तीसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चाद्वारे दिला आहे. याप्रसंगी ग्रा.पं. सरपंच संगीता चौधरी, आदिवासी शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे, ज्येष्ठ नेते साहेबराव चौधरी, दिक्षी सोसायटी चेअरमन वसंत चौधरी, दौलत चौधरी, रंगनाथ गांगुर्डे, राजेंद्र धुळे, एकनाथ चौधरी, आदिवासी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष भारत कडाळे यांचेसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अन्यथा आंदोलन दिक्षी गावात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री मुळे दिवसभर शेतात मोलमजुरी करणारा शेतमजूर आपली दिवसभराची मजुरी ही दारू पिण्यात घालवतो. तसेच दारू पिऊन घरातील महिलेला मारहाण करतो. यामुळे महिलांचा असंतोष वाढला असून त्यांनी आज कायदेशीर मार्गेे आंदोलन केले. पण जर संबंधित धंदे बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन करणार.

अर्जुन गांगुर्डे, संस्थापक अध्यक्ष (आदिवासी शक्ती संघटना)

महिला कायदा हातात घेतील आम्ही स्थानिक पातळीवर प्रयत्न केला पण स्थानिक पोलीस प्रशासनाने लक्ष दिले नाही म्हणून आज या महिलाना मोर्चा काढावा लागला. यापुढेही पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर ग्रामस्थ कायदा हातात घेतील व लवकरच या विषयासंदर्भात नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील याची भेट घेणार आहोत.

संगीता चौधरी, सरपंच (दिक्षी)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com