नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नव नाथपंथी बहुउद्देशीय संस्थेकडून महिला दिनानिमित्त सिडको परिसरातील माणिक नगरमधील भाग्यश्री चव्हाण यांच्या कार्याची दखल घेउन त्यांचा सत्कार करण्यात आला.

चव्हाण यांनी आपल्या नवजात मुलीला स्वत:चे लिव्हरचा तुकडा देवून जिवनदान देण्याचा अनोखा प्रयत्न केला.

त्यात त्यांना यश जरी आले नसले तरी समाजातील इतर महिलांना त्यांनी पहिली मुलगी असतांना ही दूस-या नवजात मुलीच्या जीवनाला अथक प्रयत्न केल्या बद्दल जागतिक महिला दिनी त्यांचा सत्कार करुन समाजा समोर आदर्श ठेवण्यात आला.

तसेच 10 वर्षा पासून महिला बचत गट तयार करुन अनेक महिलांना बचतीचा संदेश देवून रोजगार उपलब्ध करुन दिलेल्या कार्याची दखल घेत अलका चव्हाण यांचाही सत्कार करुन सक्षम महिला सक्षम परिवार म्हणून उपक्रम राबवण्यात आला.