घरकाम करणार्‍या महिलांना अनुदान मिळण्यास सुरुवात

घरकाम करणार्‍या महिलांना अनुदान मिळण्यास सुरुवात

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

सीटू (Citu) संलग्न महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार संघटनेच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिलांना (Women domestic workers) अनुदान (Subsidy) मिळण्यास आता सुरवात झाली आहे...

घरकामगारांना महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) कोणत्याही सामाजिक सुविधांचा लाभ मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार संघटनेच्या वतीने (Maharashtra Domestic Workers Union) या कामगारांना संघटित करून शासन स्तरावर त्याचा सतत पाठपुरावा केला गेला.

या माध्यमातून महाराष्ट्र राज्य घरकामगार मंडळाची स्थापना 2011 ला करण्यात आली. 2014 पर्यंत वेगवेगळ्या सामाजिक सुविधांचा लाभ या कामगारांना मंडळामार्फत मिळण्यास सुरुवात झाली. मात्र 2014 पासून कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नव्हता.

घरकाम करणार्‍या महिलांना अनुदान मिळण्यास सुरुवात
बापरे! पावसामुळे अर्धा रस्ताच खचला

तेव्हा सीटू संघटनेच्या वतीने माध्यमातून या कामगारांचे प्रश्न शासन स्तरावर वेळोवेळी देण्यात आले. या योजना पुनर्जीवित करून या योजनांचा लाभ आता हळूहळू मिळू लागला आहे.

यात सन्मान योजनेअंतर्गत घरकाम महिलांना आता लाभ मिळण्यास सुरुवात झाल्याबद्दल जनवादी महिला संघटनेच्या सिंधू शार्दूल (Sindhu Shardul) यांनी समाधान व्यक्त केले.
सीटू संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड (Dr. D. L. Karad) यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल ननावरे, रोहिणी अहिरे आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com