नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरासह ग्रामीण भागात सध्या महिलावर्गाकडून वाळवणाच्या कामांची लगबग सुरु आहे. शहरातील अनेक घरांच्या गच्चीवर, अंगणात महिलांकडून सध्या या कामांना सुरुवात झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे वादळे सुरु होण्याच्या आधीच याकामांना प्राधान्य देण्यासाठी महिलावर्ग सध्या व्यस्त दिसून येत आहे.

(सर्व फोटो : सतीश देवगिरे)

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश महिला घरगुती पद्धतीने बनवलेल्या पदार्थांना आजही पसंती देताना दिसून येतात. रेडीमेड देखील विक्री करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात सध्या साबुदाण्याची चकली, मसाले, पापड, कुरडया, शेवया करण्यासाठी सध्या प्रत्येकाच्या घरी तयारी सुरु आहे.

ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने हे सारसामान तयार केले जाते. अनेक ठिकाणी महिलांना बनवता येत नाही पण ते युट्युब सारख्या समाजमाध्यमांवर व्हिडीओ बघून काही पदार्थ बनविण्यासाठी प्राधान्य देताना दिसून येतात.

वाळवणाची पदार्थ करताना महिलांना उन्हाचा चटका बसू नये तसेच बनवलेल्या पदार्थांना जास्तीत जास्त ऊन मिळावे यासाठी महिला सकाळी उठून सर्व कामे बाजूला ठेवून वाळवणाला प्राधान्य देताना दिसून येत आहेत.