Video : ...तर अशा बालकांना मिळणार आधार

महिला व बालकल्याण विभागाचे आवाहन
Video : ...तर अशा बालकांना मिळणार आधार
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | Nashik

करोना संसर्गाच्या काळात दोन्ही पालक रूग्णालयात असणार्‍या अथवा दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची जबाबदारी महिला व बालकल्याण विभागाकडून घेतली जाणार असून यासाठी बालकांशी सबंधीत संस्थांशी संपर्क साधण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कोवीड काळात दोन्ही पालकांचा मृत्यू झालेली बालके बालकामगार, बेकायदेशीर दत्तक अथवा मानवी तस्करीला बळी पडू शकतात. अशा बालकांच्या मदतीसाठी शासनाचा महिला व बालकल्याण विभाग कार्यरत आहे.

ज्या बालकांचे आई तसेच वडिल असे दोन्ही पालक कारोना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल झाले असतील तर अशा बालकांना तात्पुर्ता निवारा देण्यात येत आहे. तसेच दोन्ही पालक गमावले असतील तर अशा बालकांची काळजी व संरक्षण तसेच त्यांची व्यवस्था करण्याचे काम बालकल्याण विभागा अंतर्गत कार्यरत चाईल्डलाईन, बालकल्याण समिती, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, जिल्हास्तरीय कृतीदल करत आहेत.

या संस्थांच्या माध्यमातून आलेल्या मुलांची आधार आश्रम, शेल्टर डॉन बॉस्को बॉम्बे सेल्शीअन सोसायटी, मुलींचे निरिक्षणगृह, बालगृह, शासकीय मुलींचे अनुरक्षकणगृह आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे. अशी मुले आढळल्यास अगर कोणत्या मुलांना मदत हवी असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

असे हेल्पलाईन क्रमांक

चाईल्ड लाईन : १०९८

महिला व बालविकास विभाग : ८३०८९९२२२२/७४०००१५५१८

बाल कल्याण समिती : ०२५३- २३१४५९८/९९२२६१६२८०

बालविकास अधिकारी : ०२५३-२२६३६८

जिल्हा बाल संरक्षण कक्ष : ०२५३ - २२३६२९४

जिल्हास्तरीय कृती दल : ९७६२३१३१५६

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com