मटका अड्डे बंद करण्यासाठी महिला आक्रमक

मटका अड्डे बंद करण्यासाठी महिला आक्रमक

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) सुरु असलेले अवैध धंदे (illegal business) बंद करण्यात यावे. अन्यथा, तीव्र आंदोलन (agitation) छेडण्यात येईल, असा इशारा सहेली ग्रामीण बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा शैलाताई उफाडे यांच्यासह महिलांनी दिंडोरीच्या तहसीलदारांना (Tehsildar) निवेदनाद्वारे (memorandum) दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस ठाण्याच्या (Vani Police Station) हद्दीतील अवैध मटका अड्डे (Illegal pot dens), बेकायदेशीर दारु विक्री (Illegal sale of liquor) भरवस्तीत चालू आहे. एक महिन्यापूर्वी देशदूतने अवैध धंदे मटका अड्डे, बेकायदेशी दारु विक्री बंद होण्याबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर तात्पुरते बंद करुन पुन्हा ‘जैसे थे’ सुरु झाले आहे.

दिंडोरी तालुक्यातील व वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोणतेही मटका अड्डे, बेकायदेशीर दारु विक्री बंद झालेली नाही. दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निगडोळ (nigdol), ननाशी (nanashi), पालखेड (palkhed), कोशिंबे, लखमापूर फाटा, चिंचखेड, करंजखेड, वणी, जानोरी, मोहाडी, भनवड येथे राजरोसपणे मटके चालू आहे.

याबाबत महिलांनी वेळोवेळी निवेदन, अर्ज देवूनही मटका माफियांवर पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. जाणीवपूर्वक या बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे. मटका चालविण्यास सर्रास मोबाईलचा (mobile) वापर होत आहे. मटका चालवितांना मूळ मालक असतोे त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. जो या ठिकाणी सापडतो त्या नोकर माणसावर कारवाई केली जाते व पुन्हा मटका सम्राट त्यांचे अड्डे दुसर्‍या माणसांकडून सर्रासपणे सुरु ठेवतात. जो त्यांच्या विरोधात आवाज उठवतो त्यास धमक्या दिल्या जातात.

दिंडोरी तालुका (dindori taluka) हा आदिवासी तालुका (tribal taluka) असून रोजंदारीने मोलमजूरी करणार्‍यांची संख्या जास्त आहे. तेच लोक या मटक्याच्या गुत्यावर दिसून येतात. अनेक अल्पवयीन मुलांना देखील मटक्याचा तसेच दारुचे व्यसन जडलेले असून ते मुले शिक्षणांपासून वंचित होऊन मटका खेळत आहे. त्यामुळे त्यांचे त्याचप्रमाणे अनेक मोलमजूरी करणार्‍यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. तरी त्वरीत उपाययोजना करुन तालुक्यातील मटका अड्डे बंद करण्यात येऊन खर्‍या मटका सम्राटांना अटक करावी.

रोजंदारीने काम करणार्‍यांविरुध्द दिखाव्यापुरती कार्यवाही करुन महिलांची दिशाभूल करु नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सहेली ग्रामीण बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा शैलाताई उफाडे, रेखा गांगोडे, सुमन घोरपडे, निकीता बावा, तुळसाबाई शार्दुल, सखुबाई बदादे, यशोदा शार्दुल, चांगुणा धोंगडे, लक्ष्मी गांगोडे, यमुना गांगोडे, लताबाई गांगोडे, लीलाबाई ब्राम्हणे, गोजरा शेखरे, उषा डंबाळे, सिंधू वाघमारे, खुशाली भरसट, प्रमिला धुळे, अनुषा पवार, शीलाबाई शेखरे आदींनी दिला आहे.

अवैध धंदे व मटका सुरु असलेली गावे

निगडोळ, ननाशी, पालखेड, कोशिंबे, लखमापूर फाटा, चिंचखेड, करंजखेड, वणी, जानोरी, मोहाडी, भनवड आदी गावे महिलांच्या रडारवर.

Related Stories

No stories found.