गर्दीचा फायदा घेत महिलेची पोत लांबविली

गर्दीचा फायदा घेत महिलेची पोत लांबविली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बसमध्ये (Bus) चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील ९८ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला...

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार शकुंतला प्रकाश ताजणे (Shakuntala Prakash Tajane) (५९, रा. कैलास सोसायटी, रेवणी बंगला, टाकळी रोड, द्वारका, नाशिक) ह्या ओझरला जाण्याकरिता संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास संत कबीर नगर बस स्टॉप वर बस मध्ये चढत होत्या.

गर्दीचा फायदा घेत महिलेची पोत लांबविली
नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

यावेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचा लक्ष्मी हार व २३ हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची पोत, असा ९८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

गर्दीचा फायदा घेत महिलेची पोत लांबविली
मविआत नाराजीनाट्य कायम; शिवसेनेच्या 'त्या' निर्णयावर काँग्रेस, राष्ट्रवादी नाराज

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वपोनी दत्तात्रय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शरद बाविस्कर करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com