मुलबाळ होत नसल्याने दुसरे लग्न करेल सांगत महिलेचा छळ; महिलेची आत्महत्या

मुलबाळ होत नसल्याने दुसरे लग्न करेल सांगत महिलेचा छळ; महिलेची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मुलबाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीकडून महिलेला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. यातच पतीने मुलबाळ होत नसल्याने दुसरे लग्न करेल अशी धमकीही महिलेला दिली होती. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या महिलेने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सातपूरच्या वासाळी परिसरात घडली....

या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अधिक माहिती की, संशयित आरोपी पती कृष्णा गोविंद सोळे (रा. दुगारवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) याच्यासह कुटुंबीयांनी पत्नी मैना मधुकर वाघ उर्फ मैना कृष्णा सोळे (वय २६) यांना मुलबाळ होत नसल्याने शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच वेळोवेळी मुलबाळ होत नसल्याने दुसरे लग्न करणार असल्याची धमकीदेखील दिली.

तसेच दररोज मद्य प्राशन करून पती नेहमी मैना हिस मारहाण करत होता. या सर्व त्रासाला कंटाळून महिलेने वासाळी शिवारातील संदीप चव्हाण यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी महिलेचे वडील मधुकर लखमा वाघ (वय ४५) रा गावठा पैकी घोंगडी पाडा शिरसगाव ता. त्र्यंबकेश्वर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) तक्रार दाखल केली असून पतीसह सासऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण (Senior police inspector mahendra chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एच के नागरे (API H K Nagare) करत आहेत.

Related Stories

No stories found.