माहेरून वीस लाख घेऊन ये! विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

माहेरून वीस लाख घेऊन ये! 
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

माहेरून वीस लाख रुपये घेऊन ये असे सांगत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...(woman suicide in mhasrul police station area)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर शेना धनगर ( ५४,रा.फ्लॅट नंबर ३,ओमकार हाईट,गोकुळ नगर मखमलाबाद रोड,नाशिक ) यांची मुलगी श्रद्धा (२८ ) हिचे लग्न धनंजय संतोष धनगर (३१,रा.वडती,ता.चोपडा,जि.जळगाव हल्ली रा.कल्याणी नगर दादावाडी,जळगाव ) याच्याशी झाला होता.

दरम्यान, श्रद्धा हिला ऑफिस विकत घेण्यासाठी माहेरहून विस लाख रुपये घेऊन ये असे सांगत तिचा सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ करून तिला उपाशी ठेवले जात होते.

तसेच तिला मारहाण करून सोशल मीडियावर हास्य इमोजी पाठवले होते. मानसिक तणावात येत श्रद्धाने वडिलांच्या घरात नाशिक येथे (दि.३ ) गळफास घेत आत्महत्या केली.

याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) श्रद्धा च्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती धनंजय व सासू संगीता संतोष धनगर (५० )यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब चतुर (PSI Balasaheb Chatur) करत आहेत.

Related Stories

No stories found.