ओझर l Ozar (वार्ताहर)रस्त्याने घराकडे जाणाऱ्या पादचारी महिलेस कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी महिला गंभीर जखमी झाली असल्याची घटना ओझर येथे घडली..मंगळवार (दि. ९) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पुष्पा विजय चिंचोळकर, वय ४९, रा. ओझर. या ओझर मर्चंट बँकेकडून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने घराकडे जात असतांना मागून वेगाने आलेल्या इंडिका व्हिस्टा कारने (एम एच १५ डि सी ९७८१) त्यांना धडक दिल्याने चिंचोळकर यांच्या दोन्ही पायांना दुखापत होऊन गंभीर जखमी झाल्या.त्यांना ओझर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कारसह चालक फरार झाला. या संदर्भातचिंचोळकर यांनी काल तक्रार नोंदविल्यावरून रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार के. बी. यादव करीत आहे.