बसमध्ये महिलेचा विनयभंग

बसमध्ये महिलेचा विनयभंग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर (Nashik city) बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग (molestation) झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील सिटीलिंक (Citilink) या सार्वजनिक प्रवासी (public transport) बसने संबधित महिला प्रवास करत असताना दिवसा हा प्रकार घडला आहे. यामुळे खळबळ निर्माण झाली.

शासनाच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसंबंधी कायदेशीर उपाययोजना करत असल्याचे सांगण्यात येत असले तरी, अशा प्रकारच्या घटना या महिलांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहेत.

घडलेली घटना अशी की, पीडित (victim) महिला आज दुपारी सिटीलिंक बसने (एमएच १५ जीव्ही ८०७४) नाशिकरोडकडे जात होती. त्यावेळी महिलेच्या बाजूच्या सीटवर बसलेला संशयित कोमलकुमार प्रभूलाल सानिक (वय ४८) याने सुजाता बिर्ला हॉस्पिटल (Sujata Birla Hospital) स्टॉपजवळ बस आली असता आक्षेपार्ह वर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयीताला अटक केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com