महिला कर्मचारी भीतीच्या सावटाखाली; सहकाऱ्यांकडून विनयभंग

महिला कर्मचारी भीतीच्या सावटाखाली; सहकाऱ्यांकडून विनयभंग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एका वाहन विक्रीच्या शोरूममध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीचा तिच्या सहकाऱ्यांनी वारंवार विनयभंग (Mola) करीत तिला दमदाटी, शिवीगाळ केल्याचा प्रकार मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेने मुंबईनाका पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांविरोधात विनयभंग, मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे....

पीडितेच्या फिर्यादीनुसार, ऑगस्ट २०२१ ते ४ जानेवारी २०२२ या कालावधीत गडकरी चौकातील वाहन विक्रीच्या शोरूममध्ये (Vehicle Showroom) संशयित अमरीन शेख सैय्यद (रा. भाभानगर) या महिलेसह राशिद जाटू (रा. मुंबई), मुजम्मील शेख व योगेश तलवारे यांनी विनयभंग केला.

संशयित अमरीन हिने पीडितेस वारंवार शिवीगाळ, धक्काबुक्की, धमकी दिल्या. तर मुजम्मील याने पीडितेचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com