कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याकडून महिलेचा विनयभंग

कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याकडून महिलेचा विनयभंग

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड व उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयताधारी टोळीची दहशत सुरूच असून ही दहशत अद्यापही थांबलेली नाही. उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या इच्छामणी जॉगिंग ट्रॅक समोरील रस्त्यावर एका कोयताधारी टोळक्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून नातेवाईकांना मारहाण केली...

यावेळी टोळक्याने कोयता काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार या टोळक्याविरुद्ध उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याकडून महिलेचा विनयभंग
Video : दहा वर्ष उलटूनही गोदावरी दुषितच; याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली खंत

यासंदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून त्यात म्हटले आहे की, नातेवाईकासमवेत उपनगर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात असताना यातील संशयित आरोपी राकेश कागडा, सचिन कागडा, विनय सौदे (तिघे राहणार महाराष्ट्र हायस्कूल जवळा उपनगर नाशिक रोड) हे त्यांची एक्टिवा गाडीवर आले.

कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याकडून महिलेचा विनयभंग
५१ हजारांची लाच घेणारा खासगी ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

त्यांनी माझ्या मुलीकडे बघून अश्लील हावभाव केले व विनयभंग केला. त्याचप्रमाणे अश्लील भाषेत शिव्या दिल्या व धक्काबुकी केली. त्यानंतर नातेवाईकांना मारहाण करून गाडीतून कोयता काढण्याचा प्रयत्न केला व दहशत निर्माण केली असेही तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीनुसार उपनगर पोलिसांनी या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com