वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

सटाणा । प्रतिनिधी satana

सटाणा देवळा रस्त्यावरील ( Satana- Devla Road ) सावकी फाट्याजवळ रस्त्यालगत भाजी पाला विक्री करणाऱ्या महीलेस मॅक्झीमो गाडीने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक वाहन सोडून पसार झाला आहे.

तालुक्यातील ठेंगोडा येथिल रोहीदास नगर मध्ये राहणाऱ्या ४७ वर्षीय महीला भाजीपाला विक्री करून आपल्या कुटूबाचा उदरनिर्वाह करीत होती. सटाणा-देवळा रस्त्यावरील सावकी फाट्यावर रस्त्याच्या कडेला सरला दादाजी आहिरे ही महिला भाजीपाला विक्री करत होती. सटाणा शहराकडून भरधाव वेगाने वाहन क्रमांक MH- 42 -k 517 या गाडीने सावकी कडे वळन घेतले.रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्याचे कळताच वाहन चालकाने वाहन जागेवरच सोडून अपघाताची माहीती पोलिसात न कळवता पळ काढला. मयत सरला आहिरे यांचे पती दादाजी आहिरे यांनी अपघाताची माहीती पोलिसात कळवली असून मयत सरला यांच्या मृतदेहाचे सटाणा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.अपघाताचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com