कारच्या धडकेत महिला ठार

कारच्या धडकेत महिला ठार

नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon

न्यायडोंगरीकडून नांदगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाने जळगांव खुर्द येथे पायी चालत जात असलेल्या महिलेला जोरदार धडक दिली.

ह्या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायडोंगरीकडून नांंदगावच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार (क्रमांक एम.एच.15 GF 8959) चालकाने प्रांतविधीसाठी पहाटे 5:30 वाजता पायी चालत असलेल्या मोनाली शरद जाधव(32) या महिलेस जळगांव खुर्द येथील पुलाजवळ जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोनालीचा जागीच मृत्यू झाला.

मोनालीला एक मुलगा एक मुलगी असून पती हॉटेल व्यवसाय करतात. सदर कारचा चालक फरार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भादवी.279,304,(अ),मोटार वाहन कायदा-184,134(ब) 177गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सुरेश सांगळे हवा. दिपक मुंढे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com