रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी!

रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी!

महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म : इगतपुरी स्थानकावरील घटना

इगतपुरी । Igatpuri

मुंबई देवगिरी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या प्रसूतीसाठी इगतपुरी रेल्वे पोलिसांनी वेळीच धावपळ केल्याने महिलेची सुखरुप प्रसुती झाली. यामध्ये बाळ व आई सुखरुप असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.

रेल्वे पोलीसांनी केलेली धावपळ पाहुन माणुसकीचा झरा अजून जिवंत असल्याचे मानले जात आहे. महिला आणि नवजात बाळ सुरक्षित असून घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

या बाबत अधिक माहिती अशी की, रात्री परभणी येथे राहणारे कैलास पवार हे आपली गरोदर पत्नी रेखा पवार (२३), हे आपल्या गरोदर पत्नीसह मुंबई देेेवगिरी एक्सप्रेसने मूळ गावी परभणी येथे जात असतांना मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास इगतपुरी रेल्वे स्थानकात रेखा पवार यांना अचानक पोटात कळा सुरु झाल्या.

याबाबतची माहिती रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे ASI सत्यसुधन त्रिपाठी व रेल्वे पोलीस अंमलदार सचिन नागदेवते, प्रमोद आहाके, सतिष खर्डे यांनी तातडीने रेखा पवार यांना सरकारी वाहनाने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र येथे कोविड सेंटर असल्याने तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तीची प्रसुती सुखरुप झाली असुन बाळाची व रेखा हीची प्रकृती ठिक आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com