दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू; सहा वर्षीय बालक जखमी

दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू; सहा वर्षीय बालक जखमी

नाशिक रोड | Nashik Road

जेलरोड येथे रात्रीच्या वेळी जेवण करून शतपावली करणाऱ्या महिलेला दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यू (death) झाला असून तिच्यासोबत असलेला सहा वर्षीय बालक जखमी झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत (Nashik Road Police) दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोड येथील आदर्श सोसायटी, कॅनाल रोड, येथील रहिवासी महिला मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास करुणा अशोक जोगदंड, रंजना हिरे, मंगल निकम, रुजिता पगारे, रेखा दुबे,सोनाली विनीत उन्हवणे व सहा वर्षीय मुलगा इशांत उन्हवणे असे पाण्याच्या टाकी जवळून शिवाजी नगरकडे जेवण करून शतपावली करून जात होते.

यावेळी मंजुळा स्वीटस समोर पाठीमागून आलेल्या मोटारसायकल (Motorcycle) क्रमांक MH15FW1474 वरील चालकाने करुणा अशोक जोगदंड यांना जोरदार धडक दिली. या धडकेत करुणा अशोक जोगदंड (वय४५) यांच्या डोक्याला, छातीला मार लागला. तर सहा वर्षीय इशांत याला कंबरेला मार लागला. यात करुणा अशोक जोगदंड यांना जबर दुखापत झाल्याने त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. तर इशांत यास उपचारासाठी दाखल केले आहे.


याबाबत सोनाली विनीत उन्हवणे यांनी नाशिकरोड पोलिसांत फिर्याद दाखल केली असून दुचाकी चालक समर्थ कदम यास पोलिसांनी (police) ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणपत काकड करीत आहे.

दरम्यान करुणा जोगदंड यांचे पती अशोक जोगदंड यांचा दोन वर्षांपूर्वी कोविडमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर आता करुणा यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. करुणा यांच्यावर बुधवारी दुपारी जेलरोड दसक येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com