इगतपुरी
इगतपुरी
नाशिक

इगतपुरी : बिबट्याचा हल्ल्यात महिलेचा मृत्यू

चिंचलेखैरे येथील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी | Igatpuri

तालुक्यातील चिंचले खैरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी की चिंचले खैरे गावातील महिला घरातील पडवीत झोपली असताना पहाटेच्या सुमारास बिबट्याने साखरझोपेत असलेल्या महिलेवर हल्ला केला. सकाळच्या सुमारास कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी महिलेचा शोध घेतला असता गावाजवळील जंगलात महिलेचा मृतदेह आढळून आला.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास वनक्षेत्र अधिकारी ढोमसे करीत आहे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com