सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; सिन्नर तालुक्यात हळहळ

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; सिन्नर तालुक्यात हळहळ

उजणी | वार्ताहर Ujani

‌तालुक्यातील उजणी येथे महिलेला विषारी सापाने दंश (Snake Bite) केल्याने मृत्यु झाल्याची घटना घडली. कलावती प्रभाकर जगताप (वय ५५) असे या महिलेचे नाव आहे...

कलावती जगताप व प्रभाकर जगताप हे पती पत्नी मौजे उजणी येथील शेतात गट क्र. ६० मध्ये वास्तव्यास आहे. कलावती या घर काम आटोपून शेतात काम करत असतांना सोमवार (२७)रोजी दुपारी १ वा. दरम्यान विषारी नागाने त्यांना दंश केला.

याच वेळी त्यांनी दिर चांगदेव जगताप यांच्याकडे धाव घेऊन सर्प दंश झाल्याची कल्पना दिली. यावेळी त्यांनी कुठलाही विलंब न करता स्वत:च्या मोटार सायकल वर त्यांना वावी (Vavi) येथील शासकीय आरोग्य केंद्रात दाखल (Govern केले. परंतु सायंकाळी ४ वा. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

कलावती व प्रभाकर यांचा मुलगा पुर्वीच मयत झालेला असुन दोन मुलींचे लग्न होऊन त्या सासरी नांदत आहे. पती प्रभाकर जगताप हे एक पायाने दिव्यांग आहेत. त्यामुळे त्यांचा संसाराचा गाडा या कलावती शेतात काम करून व मोलमजुरी करूनच हाकत होत्या.

त्यांच्या मृत्युमुळे प्रभाकर यांच्यावर खुप मोठा दुख:चा डोंगर कोसळला आहे. कलावती यांच्या मृत्युने ग्रामस्थ व नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहे. कलावती यांचे पश्चात त्यांचे दिव्यांग पती प्रभाकर यांना शासनाने आर्थीक मदत करावी असे ग्रामस्थांकडून मागणी होते आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com