'त्या' महिलेवर २९ तासांनंतर अंत्यसंस्कार

'त्या' महिलेवर २९ तासांनंतर अंत्यसंस्कार

पेठ | Peth

बाळंतपणासाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात (Peth Rural Hospital) दि. २१ रोजी दाखल झालेल्या ज्योती दळवी (२८) यांची प्रसुत होऊन त्यांनी बाळास जन्म दिला. प्रसुतीनंतरही कुठलीही गंभीर व्याधी नसतानाही अतिरीक्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला...

पती रोजगारासाठी बाहेरगावी असल्याने केवळ १ वृद्धाच ज्योती समवेत होती. मातृत्वाचा आनंद उपभोगण्यापूर्वीच नवजात अर्भक पोरके झाले. या घटनेचा गवगवा झाल्याने ग्रामीण रुग्णालयात वातावरण तापू लागले. ग्रामीण रुग्णालयातील सेवेबाबत नातेवाईकांसह अनेक जणांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

'त्या' महिलेवर २९ तासांनंतर अंत्यसंस्कार
तारक मेहता फेम 'बबिता'चा अपघात

सुरुवातीस सेवेविषयीच्या मुद्द्यावरुण मृतदेह ताब्यास घेण्यास आप्त स्वकीयांनी नकार दिल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. या घटनेची बातमी माध्यमावर प्रसिद्ध झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले.

'त्या' महिलेवर २९ तासांनंतर अंत्यसंस्कार
'ती' प्रसूतीसाठी रुग्णालयात आली, गोंडस बाळाला जन्मही दिला, मात्र...

प्रशासनाने त्यांची समजूत घातल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह सरणावर ठेवलेला असताना बंदोबस्तात रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. या महिलेवर २९ तासानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com