सप्तशृंगी गड : महिला पोलिसाचा असाही प्रामाणिकपणा; 'इतक्या' तोळ्याची गहाळ झालेली सोन्याची चेन केली परत

सप्तशृंगी गड : महिला पोलिसाचा असाही प्रामाणिकपणा; 'इतक्या' तोळ्याची गहाळ झालेली सोन्याची चेन केली परत

सप्तशृंगी गड | प्रतिनिधी | Saptshrungi Gadh

सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gadh) दर्शनाला आलेल्या एका तरुणीची एक तोळ्याची सोन्याची चेन (Chain of Gold) (किंमत ६० हजार रुपये) गहाळ झाली होती. त्यानंतर ती चेन रोपवे परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचारी यांना सापडल्याने त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजीनगर येथील नंदिनी शिंदे ही मंगळवार (दि.०९) रोजी आपल्या मामाच्या कुटुंबासोबत सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी (Darshan) आली होते. त्यावेळी सप्तशृंगी गडावरील रोपवे ट्रॉली परिसरात गळ्यातील सोन्याची चेन गहाळ झाल्याचे नंदिनी हिच्या लक्षात आले.

सप्तशृंगी गड : महिला पोलिसाचा असाही प्रामाणिकपणा; 'इतक्या' तोळ्याची गहाळ झालेली सोन्याची चेन केली परत
डिझेल चोरांचा सुळसुळाट; स्विफ्ट गाडी सोडत पलायन

त्यानंतर चेन गहाळ झाल्याची तक्रार तिने (नंदिनी) सप्तशृंगीगड येथे रोपवे परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी (Women Police Personnel) निकम यांच्याकडे केली. त्यावेळी निकम यांनी गहाळ झालेल्या सोन्याच्या चेनीचा तपास सुरू केला असता रोपवेतील कोपऱ्यात चेन आढळून आली. यानंतर महिला पोलीस नाईक निकम यांनी ही चेन नंदिनी शिंदे हिची असल्याची खात्री पटवत तिला (नंदिनी) परत केली.

सप्तशृंगी गड : महिला पोलिसाचा असाही प्रामाणिकपणा; 'इतक्या' तोळ्याची गहाळ झालेली सोन्याची चेन केली परत
आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे मोठे विधान

दरम्यान, यानंतर कळवणचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे (Saadhan Nagre) यांच्यासह भाविकांनी (Devotees) महिला पोलीस नाईक निकम यांनी प्रामाणिकपणे चेन परत केल्याने त्यांचे कौतुक केले. तर नंदिनी शिंदे हिने सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

आम्ही सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आलो असता सोन्याची चेन गहाळ झाली. त्यावेळी मी खूप घाबरले, मात्र समोर खाकी कलर दिसल्याने आम्ही सर्व हकीकत महिला पोलीस कर्मचारी यांना सांगितली. त्यानंतर माझी गहाळ झालेली सोन्याची चेन पोलीस नाईक निकम यांच्या मदतीने मिळाली.

नंदिनी शिंदे, संभाजीनगर

सप्तशृंगी गडावर हजारो भाविक दर्शनासाठी येतात. याठिकाणी महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणात सोने परिधान करतात. मात्र याचाच फायदा गर्दीच्या ठिकाणी चोरी करणारे चोर घेत असतात. मी कळवण पोलीस ठाण्याचा वतीने भाविकांना आव्हान करेल की दर्शनाला येतांना सोन्याचे दागिने मूल्यवान वस्तू आणण्यास टाळावे.

समाधान नागरे, पोलीस निरीक्षक, कळवण

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com