नाशकात महिलेची गळफास घेत आत्महत्या

नाशकात महिलेची गळफास घेत आत्महत्या

नवीन नाशिक| प्रतिनिधी | New Nashik

घराच्या छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेत एका महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उपेंद्रनगर (Uprendranagar) परिसरात घडली...

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार उर्मिला आनंद चव्हाण (Urmila Anand Chavan) (32,रा. रिंकी संकुल च्या बाजूला, प्रशांत लॉन्ड्री समोर, उपेंद्र नगर, नवीन नाशिक) या महिलेने (दि.१३) रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास घराच्या छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल बनतोडे करत आहेत.

दरम्यान उर्मिला यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांच्या घरात त्यांचे दोन मुले होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com