महिलेची गळफास घेत आत्महत्या

महिलेची गळफास घेत आत्महत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

येथील गोरेवाडी (Gorewadi) परिसरातील माणिकनगर (Maniknagar) येथे राहणाऱ्या एका महिलेने (Women) आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...

विद्या गणेश नागरे (28) (Vidya Nagre) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेने आपल्या राहत्या घरात हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना नातेवाईकांना समजताच त्यांनी तातडीने उपचारासाठी विद्या यांना रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com